Ad will apear here
Next
पारंपरिक पिकाऐवजी शतावरीचे पीक घेऊन उत्पन्नात दुप्पट वाढ
सोलापूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी


सोलापूर :
कंदर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील नागनाथ गरड या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाटा देऊन शतावरी या औषधी वनस्पतीची लागवड करून उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे केळीच्या माहेरघरात आता शतावरी पिकाची चर्चा रंगू लागली आहे. 

कंदर हे गाव केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. या गावाला केळीच्या पिकाने एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे. असे असले, तरी त्यातून मिळणारे उत्पन्न आता एका टप्प्यावर स्थिरावले आहे. उत्पन्नवाढीला काही मर्यादा आहेत. अलीकडच्या काळात केळ्यांना चांगला दर मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यातच अति उष्णता व वादळी वाऱ्यांमुळे केळीचे पीक धोक्यात आले आहे. म्हणूनच केळी पिकाला पर्यायी पिकाच्या शोधात असताना नागनाथ गरड यांना शतावरी पिकाची माहिती समजली. या पिकाबद्दल अधिक माहिती घेऊन, अभ्यास करून त्यांनी शतावरी लागवडीचा निर्णय पक्का केला. 



गरड यांनी पाच एकरावर शतावरीची लागवड करून ती यशस्वीही करून दाखवली. शतावरी हे प्रामुख्याने उत्तर भारतात पिकणारे पीक आहे. कंदर येथील उष्ण व कोरड्या हवामानातही हे पीक चांगले आल्याचे गरड यांनी सांगितले. गरड यांना शतावरीचे एकरी ११ ते १२ टन उत्पादन मिळाले आहे. सध्या तीन एकरांतील शतावरीची काढणी झाली असून, त्यापासून सुमारे ३० ते ३५ टन उत्पादन मिळाले आहे. गरड यांनी शतावरीच्या ओल्या मुळ्या ५० रुपये प्रति किलो या हमीभावाने एका कंपनीला विकल्या आहेत. त्यामुळे त्यांना एकरी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

‘शतावरी हे आपल्याकडे पीक नवीन आहे. शतावरी खरेदीदार कंपन्या खूप आहेत; मात्र त्या कंपन्या शतावरी कमीत कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न करत अतसतात. तसेच या कंपन्या शतावरीच्या रोपांची विक्रीही जास्त दराने करतात. या दोन गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शतावरीची लागवड केली, तर त्यांचे नुकसान तर होणार नाहीच; मात्र त्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल,’ असे गरड यांनी सांगितले.



पारंपरिक पिकाला बगल देऊन नवे पीक घेण्याचे धाडस गरड यांनी दाखविले. तसेच, त्यासाठीचा अभ्यास करून ते पीक त्यांनी घेतले. त्यामुळे आपल्या उत्पन्नात दुप्पट वाढ साधण्याची किमया त्यांना जमली आहे. शेतकऱ्यांनी अभ्यास करून आपापल्या भागात योग्य त्या औषधी वनस्पतींची लागवड आवर्जून करावी, असा सल्लाही नागनाथ गरड यांनी दिला.

‘शतावरीच्या लागवडीतून मला यंदा माझ्या नेहमीच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात माझा हातभार लागला आहे,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZIICB
 व्वा..!! आदिवासी बांधवांनी वनसंवर्धनाचे मोलाचे कार्य केले आहे..मोरांचा अभ्यास होणे गरजेचे आहे..अभ्यासपूर्ण लेख...शशिदादा.
Similar Posts
एकनाथ खडसे यांची करमाळ्याला भेट करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असताना राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी करमाळा येथे भेट दिली. के. के. पाटील, मंगेश चिवटे, नगरसेवक किरण बोकल, लहूजी शिनगारे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
दुष्काळातही सोलापूरच्या आमराईत आंबे लगडले सोलापूर : जिल्ह्यात सध्या भयाण दुष्काळी परिस्थिती असतानाही घोटी (ता. करमाळा) येथील आंबा उत्पादक रेवणनाथ पाटील यांच्या बागेत झाडाला पिकलेले आंबे लगडलेले असल्याचे चित्र अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाहायला मिळाले.
लॉकडाउनने दाखवला केळी प्रक्रिया उद्योगाचा मार्ग; विद्यार्थ्यांचाही सहभाग सोलापूर : स्वतः कष्टाने पिकविलेला शेतीमाल शेतात वाया जाऊ नये म्हणून रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी कलिंगडे, केळी परिसरातील कुटुंबांना दान केली. कच्च्या केळ्यांचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करण्याचा उपक्रम सध्या या भागात राबविला जात आहे. विशेष
लॉकडाउनमध्ये आमराईतच ग्राहकांना केशर आंब्याची विक्री सोलापूर : पंढरपूर व सांगोला तालुक्यातील खवय्यांना यंदा अस्सल केशर आंब्याची चव चाखायला मिळाली. पंढरपूर येथील बेदाण्याचे व्यापारी अविनाश शेटे यांनी लॉकडाउनच्या काळात आपल्या ग्राहकांना रसाळ आणि अवीट गोडीचे आंबे थेट शेतातून उपलब्ध करून दिले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language